करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालय, व्यायामशाळा, मंगल कार्यालये, सिनेमागृहे, नाट्यगृहे बंद ठेवावेत – जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे निर्देश

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मराठवाडा राष्ट्रीय

नांदेड : वैजनाथ स्वामी 

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालय,व्यायामशाळा, मंगल कार्यालये, सिनेमागृहे, नाट्यगृहे पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात यावेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्या अध्यदक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षामध्येा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोंचिग क्लासेस, व्यायामशाळा, मंगल कार्यालय चालक / मालक यांची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.