आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्रात मोफत सेट/नेट कार्यशाळा संपन्न.

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मराठवाडा

उदगीर/प्रतिनिधी

उदगीर येथील मातोश्री शारदाबाई पवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित “आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राच्या” वतीने उदगीर तालुक्यातील व परिसरातील ज्या विद्यार्थ्यांचे प्राध्यापक होण्याचे स्वप्न आहे पण आपली आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे सेट/नेट चे शिकवणी लावण्यासाठी मोठमोठ्या शहरात जाऊ शकत नाहीत अश्या अनेक विद्यार्थ्यांचे प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावं त्यांना योग्य ते मार्गदर्शन आपल्याच शहरात मिळावं या हेतूने उदगीर येथील सतत सामाजिक कार्यात व विद्यार्थी चळवळीत अग्रेसर असणारा युवक श्रीकांत जाधव यांनी मातोश्री शारदाबाई पवार सेवाभावी संस्थेची स्थापना करून त्याच्या माध्यमातून मोफत अभ्यासिका स्थापन केली एवढ्यावरच न थांबता या ध्येयवेड्या युवकाने प्रत्येक “रविवारी स्पर्धा परीक्षा संवाद” घेण्याचा संकल्प केला आहे व त्याचाच भाग म्हणजे “पहिला स्पर्धा परीक्षा संवाद” सेट/नेट चा अभ्यास करणाऱ्या युवकांसाठी मोफत कार्यशाळा ठेवून या स्पर्धा परीक्षा संवादाला मुख्य मार्गदर्शक म्हणून उदयगिरी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांचे सेट/नेट पेपर प्रथम या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ठेवले.

या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावणारे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांनी सेट/नेट परीक्षेचा सर्वांना उपयोगी असणारा पेपर पहिला या विषयावर सखोल मार्गदर्शन केले व अभ्यास कसा करावा अभ्यासातील छोट्या छोट्या ट्रिक विद्यार्थ्यांना समजून सांगून त्या आमलात आणावे यासाठी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेस अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणारे उदयगिरी महाविद्यालयाचे लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा.डॉ.गौरव जेवळीकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतेवेळी वेळेचे नियोजन कसे केले पाहिजे व प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढून आपल्या निश्चित ध्येयापर्यंत कसे गेले पाहिजे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस उदगीर तालुक्यातील व आजूबाजूच्या दोन/तीन तालुक्यातील जवळपास 50 ते 60 विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून मोफत कार्यशाळेचा लाभ घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन “आधार मोफत अभ्यासिकेचे” व्यवस्थापन परिषद सदस्य जयकुमार लवटे यांनी केले तर कार्यशाळा घेण्यामागचा उद्देश काय आहे हे विद्यार्थ्यांना मातोश्री शारदाबाई पवार संस्था संचलित “आधार मोफत अभ्यासिकेचे” संचालक श्रीकांत जाधव यांनी सांगितले व आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले.