कोरोनाच्या अफवावर विश्वास ठेऊ नका-डॉ.संभाजी पाटील ….. गर्दीच्या ठिकाणी जाने टाळावे तसेच स्वच्छता बाळगण्याचे डॉक्टरांकडून आव्हान

ठळक घडामोडी देगलूर नांदेड नांदेड जिल्हा
देगलूर : विशाल पवार
        सध्या संपूर्ण देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आज देशभरातील प्रत्येक नागरिकांच्या मनात भीती निर्माण केली आहे.
        आज देगलूर तालुक्यात ही या कोरोनाचा व्हायरस ची खूपच अफवा पसरली होती.या अफवेचा बळी हा तडखेल येथील एक व्यक्ती झाला. दुबई येथून मायदेशी परतलेल्या एका व्यक्तीस या कोरोणाने पुर्णतः आपल्या अफवांच्या चपेटात घेतल्याचे दिसून आले आहे.
        मायदेशी परतलेल्या रूग्णास देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात बळजबरीने व गावकऱ्यांच्या आग्रहास्त उपचारासाठी दाखल करण्यात आले.
            परंतु या व्यक्तीस रूग्णालयात दाखल करताच देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ संभाजी पाटील यांच्या देखरेखीत संशयित रुग्णाची तपासणी  करण्यात आली. तपासणी नंतर कळाले की या व्यक्तीस कोरोणा व्हायरसची कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळवून आली नाही.
          त्यामुळे या रूग्णास तात्काळ त्यांच्या घरी हलवण्यात आले तसेच रूग्णाच्या देखरेखीसाठी मरखेल येथील PAC च्या अधिकाऱ्यांच्या टीमच्या वतीने देखरेखीसाठी १४ दिवसांसाठी घरांतच ठेवण्यात आले आहे असे डॉ. संभाजी पाटील म्हणाले