अज्ञात वाहनाच्या धडकेत मुखेड येथील वकीलाचा मृत्यू

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
मुखेड तालुक्यातील येवती येथील ॲड. गोरोबा शंकर कांबळे यांच्या मोटारसायकलला  अज्ञात वाहनाने धडक मारली असता त्यांचा मृत्यू झाल्याची घटना दि 25 रोजी घडली.
नरसीहुन मुखेडकडे दि 15 रोजी दुपारी 3 वाजता येत असताना आलूवडगाव जवळ भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत  मोटारसायकलवर स्वार असलेले गोरोबा कांबळे यांच्या गाडीला जबर धडक बसली .
या अपघातात ॲड.गोरोबा  कांबळे हे   गंभीर जखमी झाल्याने नायगाव येथील रुग्णालयात त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान त्यांना गंभीर लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
      त्यांच्या पश्चात दोन मुले ,एक मुलगी असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने  सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .