कंधार तालुक्यातील घोडज गावातील कामेश्वरच्या शौर्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक ; कामेश्वरने पाण्यात बुडत असलेल्या दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला होता

ठळक घडामोडी नांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या महाराष्ट्र

वैजनाथ स्वामी

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या घोडज गावातील, कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या 14 वर्षाच्या आठवीतील धाडशी विद्यार्थ्यांने, मानार नदीच्या पाण्यात बुडत असलेल्या, दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला. कामेश्वरीने नदीत उडी घेऊन मोठ्याधाडसाने या दोघा मुलांना नदीतून बाहेर काढले.

या कौतुकास्पद कार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनातील त्यांच्या दालनात धाडसी कामेश्वरचा सत्कार केला व त्याचे कौतुक केले. यावेळी लोहा मतदार संघांचे आमदार श्यामसुंदर शिंदे, कामेश्वरचे वडील जगन्नाथ वाघमारे उपस्थित होते. मनोविकास माध्यमिक शाळेतील, इयत्ता दहावीत शिकत असलेले, ओम विजय मठपती, आदित्य कोंडीबा दुऊंदे गजानन विश्वनाथ श्रीमंगले हे तिघे विद्यार्थी घोडज येथील ऋषी महाराज मंदिरात दर्शनासाठी गेले होते.

मंदिराजवळ असलेल्या माणार नदीत अंघोळ करून ते दर्शनाला जाणार होते. नदीपात्रातील पाणी पायर्‍यांपर्यंत आल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, तिघेही विद्यार्थी पाण्यात बुडत असताना ओरडण्याचा मोठा आवाज आला, हा आवाज कामेश्वर वाघमारे च्या कानावर पडला. रामेश्वर ने मोठ्या साहस व धाडसाने यातील दोघांना वाचवण्यात यश मिळवले, परंतु ओम मठपती याला वाचवण्यात तो अपयश झाला. या धाडशी कामगिरी बद्दल कंधार च्या तहसीलदारानी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी रामेश्वर वाघमारे यांच्या नावाची शिफारस जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे.