भोकर नगरपरिषद निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने उद्या भारत प्रभात पार्टीची बैठक

नांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या भोकर

पवन जगडमवार

दि.१४ मार्च २०२० रोजी भोकर येथे भारत प्रभात पार्टीची आढावा बैठक घेण्यात येणार असून ,सदरील बैठक प्रदेश अध्यक्ष माधव मेकेवाड यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येणार आहे.भोकर नगरपरिषद सदस्यत्वाचा निवडणुकीचा कार्यकाळ संपत आला आहे.भोकर मध्ये काँग्रेस-भाजपा ह्या दोन पक्षात प्रामुख्याने लढत आजपर्यंत होते त्यात नव्याने उडी घेणार आहे ते म्हणजे भारत प्रभात पार्टी(दिल्ली) शाखा महाराष्ट्र प्रदेश ही काही महिन्यापूर्वी खाली महाराष्ट्रात लोकसभा विधानसभा लढून आता सर्वच निवडणूक लढवण्यासाठी उडी घेणार असून त्यात येणाऱ्या आगामी निवडणूक संदर्भात किती जागा लढवणार ह्यावर चर्चा होणार आहे तसेच कोणत्या समविचारी पक्षासोबत युती करता येते का त्यासाठी चर्चा होणार आहे तरी आपली उपस्थिती अनिवार्य आहे असे आव्हान तालुका अध्यक्ष रामेश्वर चर्लेवाड व शहर अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड यांनी केले आहे तरी सर्व साथीदारांनी दि १४ मार्च २०२० रोजी सकाळी १० वाजता ,भोकर शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित राहावे भोकर नगरपरिषद मध्ये निवडणूक लढू इच्छिणारे सर्व इच्छुक उमेदवार सुद्धा ह्यावेळी उपस्थित राहणार आहेत

सदरील बैठकी मध्ये प्रमुख पाहुणे
म्हणून डॉ.नितीन पवार पुणे (महाराष्ट्र राज्य महासचिव),हेमंत खरात साहेब मुंबई(राज्य उपाध्यक्ष),दिलीप शिवाजी पाटील (नाशिक), सौ.दीपा संजय आवळे सांगली (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा, महिला आघाडी), संजय नरवाडे(मराठवाडा अध्यक्ष), संजय बिलोलीकर
(मराठवाडा,कार्याध्यक्ष),बालाजी आरकटवार (मराठवाडा उपाध्यक्ष),वर्षाराणी नामवाड(मराठवाडा अध्यक्षा), कु.जोत्सना राऊत(शॉर्ट फिल्म,अभिनेत्री),कु. मधू पाटील(महाराष्ट्र अध्यक्षा, युवती आघाडी)कार्यक्रमाचे आयोजन रामेश्वर चर्लेवाड (तालुका अध्यक्ष,भोकर), लक्ष्मण गायकवाड(शहराध्यक्ष, भोकर) व कुणाल पवार(ता.सचिव) आदिची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.