मुखेड येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जळून खाक कक्षातील म्हत्त्वाचे दस्तावेज जळाले

ठळक घडामोडी नांदेड नांदेड जिल्हा महाराष्ट्र

मुखेड : पवन जगडमवार

मुखेड शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कक्षाला दिनांक १२ मार्च रोजी पहाटे ४:३० वाजता अचानक आग लागण्याने कार्यालयातील साहित्य व कपाटातील दस्तावेज जळून खाक झाले असून यामुळे एक लाख रुपये नुकसान झाले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. रमेश गवाले यांनी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या चौकशी अर्जात नमूद केले आहे.

अारोग्य अधिकारी यांच्या कक्षाला अचानक आग लागल्यामुळे २४ प्लास्टिकच्या खुर्च्या, जिल्हा एन. सी. डी. कार्यालयाकडून प्राप्त झालेले फाॅलाॅप रजिस्टर ४० व तपासणी रजिस्टर ४०, कपाट व कपाटातील दस्तावेज, मागिल ५ ते ६ वर्षाचे लेखा अहवाल, आवक – जावक रजिस्टर आणि कार्यालयीन दस्तावेज, एक बायोमॅट्रीक मशिन, दोन इलेक्ट्रिक सिलिंग फॅन, दोन सी.एफ.एल. मर्क्युरि बल्फ, दोन ट्यूब लाईट, कक्षातील विद्युत वायरिंग, प्लोअर मॅट, खिडकी व दरवाजाचे पडदे, भिंतीची टाईल्स फरशी इत्यादी साहित्यासह दस्तावेज आगीमध्ये जळुन खाक झाले असुन या मध्ये एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली ही अद्यापही समजले नसून सदरिल घटनेचा पंचनामा पोना चंदर आंबेवर यांनी केला आहे.


  आगीचे कारण अद्यापही समजले नसुन पण ही आग साॅर्ट सर्किट मुळे लागली असावी. माझ्या आॅफिसची एक खिडकी उघडी होती त्या खिडकीतुनही धोका होऊशकतो. या आगीत म्हत्वाच्या दस्तऐवजासह वस्तुही जळाले आहेत. कक्षाला आगलागलेली माहिती आरोग्य प्रवेशक व्यंकट मावनवाड यांनी सकाळी फोन करुन माला सांगितले होते.
                      तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. रमेश गवाले