स्वा.रा.ती.म. विद्यापीठाच्या चुकीची परीक्षा पद्धती बदलण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मान्यवरांचे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने सन्मान.

इतर बातम्या नांदेड जिल्हा मराठवाडा

उदगीर/प्रतिनिधी

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड च्या वतीने राबवलेल्या चुकीच्या परीक्षा पद्धतीमुळे विद्यापीठातील पदवीचे शिक्षण घेणारे जवळपास 96% विद्यार्थी नापास झाले होते त्याच्या विरोधात उदगीर येथील विद्यार्थी आंदोलन केले होते याची दखल घेत स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य तथा युवासेनेचे लातूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.सुरज दामरे यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून विद्यापीठाचे कुलगुरू,विद्यापीठाचे रजिस्ट्रार,राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य प्रा.सुरज दामरे व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मराठवाडा अससोसिएशन फॉर स्टुडंट संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव व अन्य विद्यार्थ्यांची उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन या बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरू,विद्यापीठाचे रजिस्ट्रार यांना तात्काळ ही परीक्षा पद्धती बदलून एका दिवशी एकच पेपर घ्यावा,पुर्नमूल्यांकणाची फिस परत करावी,निकाल लवकर लावून फेरपरिक्षा लवकरात लवकर घ्यावी व यापुढील विद्यार्थ्यांच्या संदर्भात जो कोणता निर्णय घेण्यात येईल तो विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन घ्यावा असे सक्त आदेश देण्यात आले होते या आदेशाप्रमाणे विद्यापीठाने 9 मार्च रोजी एका दिवशी एकच पेपर घेण्यात येईल असे परिपत्रक काढून सगळ्यात मोठी मागणी मान्य करून विद्यार्थ्यांना व हे मागणी लावून धरणाऱ्या अनेक मंडळींना दिलासा दिला व विद्यापीठाला हा निर्णय घेण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करणारे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य तथा युवासेनेचे लातूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.सुरज दामरे,लोकभारतीचे अजित शिंदे व मराठवाडा अससोसिएशन फॉर स्टुडंट या विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव यांचा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने आभार कार्यक्रम घेऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.आर.आर.तांबोळी,उपप्राचार्य.डॉ.राजकुमार मस्के,लोकप्रशासन विभागप्रमुख प्रा.डॉ. गौरव जेवळीकर,प्रा.मोरे मॅडम,प्रा.भद्रशेट्टे मॅडम,प्रा.मुळे सर,युवासेनेचे मा.उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण पेटकर,संतोष माने लातूर, युवासेना उपजिल्हाप्रमुख रमन माने,श्रीनिवास नरहरे,तालुका प्रमुख उपेंद्र काळेगोरे,शहर प्रमुख रोहित पाटिल,शिवसेना उपतालुकाप्रमुख अंकुश ताटपल्ले ता.समन्वयक संगम पाटिल आदी उपस्थित होते.या आभार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक झुंगास्वामी यांनी केले तर प्रास्ताविक व आभार सुधीर कांबळे यांनी केले