अस्मिता फाऊंडेशनच्या माध्यमातून किशोरवयीन मुली, महिलांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या – ऋतुजा कांबळे

इतर बातम्या ठळक घडामोडी नांदेडच्या बातम्या

मुखेड : पवन जगडमवार

प्रतिनिधी – मी ज्या समाजघटकातून जन्माला आले त्या समाजाचे ऋण फेडले पाहिजे. या उदात्त हेतूने किनवटसारख्या आदिवासी ग्रामीण भागात राहणाऱ्या सामान्य कुटुंबातील ऋतुजा कांबळे हे कॉलेजवयीन शिक्षण चालू असतानाच ऋतुजा कांबळे व तीची मोठी बहीण रोहिणी कांबळे या दोघीजणी मिळून दिगंबर वाघसर यांच्या मदतीने सामाजिक बांधिलकीतून किशोरवयीन मुलींच्या मासिक पाळीच्या आरोग्यविषयक समस्येबाबत जणजागृतीचा कार्यक्रम घेण्याचा चंग मनाशी बाळगून त्यांनी स्वत:चा वाढदिवस हा महिलांच्या आरोग्यविषयक प्रबोधनातून झाला पाहिजे, या उद्देशाने त्यांनी 16 नोव्हेंबर 2018 ला अस्मिता फाऊंडेशनची स्थापना केली.

व किनवट, माहूर सारख्या आदिवासी ग्रामीण भागात तसेच नांदेड जिल्ह्यातील अनेक गावगाडा, वाडी, वस्ती, तांड्यावर मासिक पाळी व्यवस्थापन व समुपदेशनाचा कार्यक्रम हाती घेतला. स्वत:चा अभ्यास कॉलेजवयीन जीवन सांभाळत त्यांनी मासिक पाळी च्या वेळी महिलांना कशाप्रकारे काळजी घेणे गरजेचे असते यासाठी महिलान मध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांनी अस्मिता फाऊंडेशनची स्वतंत्र टीम नांदेड जिल्ह्यात सक्रिय करून अस्मिता फाऊंडेशनच्या माध्यमातून किशोरवयीन मुली, ग्रामीण भागातील बायका स्वत:च्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची याबाबत चर्चासत्र, पथनाट्य, कार्यशाळा, प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन मासिक पाळी म्हणजे काय, मासिक पाळीत घ्यावयाचा आहार, समज-गैरसमज, सॅनेटरी पॅडची निवड, मासिक पाळी ही स्त्रींची स्वतंत्र ओळख आहे. तोच तुमचा सन्मान आहे, हे पटवून देत प्रत्येक स्त्रीला अस्तिव आणि अस्मितेची जाणीव करून देणारी स्त्रीच्या आरोग्याची काळजी घेणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे ऋतुजा कांबळे. समाजातील प्रत्येक महिला ही निरोगी, सक्षम, स्वावलंबी, आत्मनिभर झाली पाहिजे, या व्यापक दृष्टिकोनातून जिजाऊ-सावित्रीबाईच्या सामाजिक जाणिवांचा वसा आणि वारसा जपणाऱ्या ऋतुजा कांबळे यांच्या सामाजिक कार्यास जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गौरव करणे आवश्यक वाटते.