अवकाळी पावसाने शाळेवरील छत उडाले तर पिकांचेही मोठे नुकसान शेतकऱ्यांना मदत करण्याची रयत क्रांतीचे कलंबरकर यांची मागणी 

ठळक घडामोडी नांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मराठवाडा महाराष्ट्र
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
      तालुक्यात अचानक आलेल्या वादळ व अवकाळी पावसामुळे रब्बी,हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन घरावरील व शाळेवरील छत उडाले आहे .
       अचानक आलेल्या पावसामुळे घरावरील,शाळेवरील छत वादळात उडून गेली तर या अवकाळी पाऊस व वादळाचा मोठा फटका शेतकऱ्यांना व  शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा  बसला आहे.
     महसूल प्रशासनाने याची दखल घेऊन,नुकसानीचे पंचनामे करून त्यांना मदत घ्यावी अशी मागणी रयत क्रांतीचे  शिवशंकर पाटील यांनी तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्याकडे मागणी केली आहे .
     अगोदरच अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाने रडविले असून
तूटपुंजी पीक विम्याची रक्कम देऊन सरकारने अडचणीत आणलेले असताना या अवकाळी पावसाने सुद्धा रब्बीचे हाताशी आलेले पीक वाया गेलेले पाहून शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहेत.