उत्कृष्ट अंगणवाडी कमर्चारी म्हणून सौ शोभा मोटरगेकर यांना पुरस्कार प्रदान 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / संदीप पिल्लेवाड

महिला व बाल विकास जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा यशोदा माता पुरस्कार  मुखेड येथील सौ. शोभा माधवराव मोटरगेकर यांना प्रदान करण्यात आला.

            यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री  अशोकरावजी चव्हाण , नांदेड जिल्हा परिषद अध्यक्षा सौ मंगाराणी अंबुलगेकर , सभापती सुशीलाताई पाटील बेटमोगरेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.