महिलांनी स्वाभिमानाने व आत्मसन्मानाने जगावे – पो.उनि.अनिता ईटुबूने मुखेड पोलीस स्टेशनच्या वतीने निर्भया रॅलीचे आयोजन

Uncategorized ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड :  पवन जगडमवार

प्रतिनिधी – मुखेड पोलीस स्टेशनच्या वतीने दि ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्ताने पोलीस निरीक्षक नर्सिंग अकुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया रॅलीचे आयोजन करण्यात आले ,या रॅली ची सुरूवात मुखेड पोलीस स्टेशनमधुन करण्यात आली आणि शहराच्या मुख्य रस्त्याने ही रॅली काढून महिला निर्भय झाले पाहिजे यासाठी जनजागृती करण्यात आली.

महिला या स्वच्छ व मनमोकळ्या वातावरणात राहिल्या पाहिजेत, जर कुठल्या महिलेवर कोणी अधिकारी अथवा सामाजिक कार्यकर्त्यांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला किंवा कुठल्याही व्यक्तिकडून महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा गुंड प्रवृत्तीच्या लोकांन कडून महिलेची छेडछाड करण्याचा, अन्याय,अत्याचार, मारहाण , दबाव,धमकवण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर ती महिला अशा कुठल्याही अन्याय, अत्याचाराला बळी न पडता निर्भय पणे येऊन जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार द्यावी, आणि पोलीसांची मदत घ्यावी असे आव्हान मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नर्सिंग अकुसकर यांनी केले.आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना निर्भय राहण्याचा संदेश मुखेड पोलीस स्टेशन च्या वतीने देण्यात आले,

या निर्भया रॅली मध्ये मुखेड येथील जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे या शाळेतील विद्यार्थीणी व शहरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीत सहभागी झालेल्या महिलांना मुखेड पोलीस स्टेशन च्या वतीने शॉल व पुष्पहार घालून तसेच फुलाचे गुच्छ देऊन महिलांचा सन्मान करण्यात आले, या रॅलीत मुखेड चे नायब तहसीलदार पी. डी.गंगनर , जि.प.शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर ,पोर्णिमाताई मंडलापुरकर,शांताबाई कांबळे, शोभाताई गव्हाणे ,व मुखेड पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक अनिता ईटुबूने यांच्या सह महिला पोलीस शिपाई वाले, हणमंते,अखरगे, गुटे, कोकणे यांच्या सह पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


महिलांनी विचारातला स्त्री-पुरुष भेदभाव कमी करावा व आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य होण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न करावे व आपल आयुष्य एक मनुष्य म्हणून स्वाभिमानाने व आत्मसन्मानाने जगावे, – महिला पोलीस उपनिरीक्षक अनिता ईटुबूने पोलीस स्टेशन मुखेड