तळेगाव येथील श्रीकृष्ण यात्रे निमित्त रक्तदान करून दिला युवकांनी सामजिक संदेश

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या हदगाव

हदगाव : देवानंद हुंडेकर

हदगाव तालुक्यातील तळेगाव येथे  अनेक वर्षा पासून श्रीकृष्ण  यात्रे चे नियोजन समस्त गावकरी मंडळी करत असते त्याच नियमा प्रमाणे या हि वर्षी श्रीकृष्ण यात्रा मोठ्या उत्सवात  सम्पन्न झाली असून या यात्रेला अनेक गावातील नागरिकांनी सहभाग घेतला होता.

श्रीकृष्ण यात्रे निमित्ताने मुख्य मार्गाने काठी माईची नगर प्रदक्षणा संगीत भजनी मंडळ लाडी चा कार्यक्रम गोपाळ मंडळीची आरती व अनेक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा स्वाद रक्तदान शिबिर तसेच कबड्डीचे खुले सामने असे अनेक कार्यक्रमाचे आयोजन हि केले होते.

गावातील  भूमिपुत्र असलेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या वेळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन   करण्यात आले होते.

गुरु गोविंद शिंग ब्लड बँक नांदेड यांना या कार्यक्रमास निमंत्रित करून गावातील गोपाळ संजय हरण ,सुर्यप्रकाश अशोक जगताप,संदिप देवीदास पाटिल,अरविंद वसंतराव गायकवाड,संतोष राजाराम माने,किशोर जगन्नाथ गायकवाड,किशोर संजय नवले,संदिप यलपा मुद्देवाड,किशोर खंडेराव पंजरे,निलेश पंजाबराव हरन,परशूराम काशिनाथ जगताप,सतीश लक्ष्मण पावडे,शिवाजी नारायण जगताप यांनी यावेळी रक्तदान करून सामजिक संदेश दिला विशेष मण्ह्जे हि यात्रा बऱ्याच  वर्षापासून चालत आलेली  परंपरा असल्या करणाने परिसरातील लोकानी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता