भीती कोरोनाची………

इतर लेख ठळक घडामोडी नांदेड जिल्हा संपादकीय

 

अमोल, जेमतेम 21 वर्षाचा असेल, सकाळी सकाळी आपल्या बहिणी सोबत मनदर्पण हॉस्पिटल ला आला. चेहरा अतिशय घाबरलेला, भेदरलेला, सदरा घामाने भिजलेला, थरथरत माझ्या केबिन मध्ये शिरला. मी त्याला स्टूल वर बसण्यास सांगितले. मी काही बोलण्याच्या आतच तो ओरडला, ‘सर मला करोना झाला, मला करोना झाला, मी आता मरणार….मला वाचवा…’ मी त्याला पाणी प्यायला दिले अणि शांत होण्यास सांगितले. मी त्याच्या बहिणीला विचारले, ‘काय झाले?’ ती म्हणाली, ‘सर 12 दिवसापूर्वी पर्यंत तो ठीक होता. एके दिवशी त्याला सर्दी अणि ताप आला. त्या करिता तो मेडिकल वर तापीची गोळी विकत घेण्यासाठी गेला. मेडिकल वाला सहज बोलता बोलता बोलून गेला, करोना आला आहे जरा जपून, हे ऐकताच एक प्रचंड भिती त्याच्या शरीरात अणि मनात संचारली, त्याने तर करोना बदल टीव्ही वर अणि पेपर मध्ये खूप काही ऐकले होते, अचानक त्याचे अंग घामाळले, भीत भीत तो घरी आला. त्याची आई त्याला त्या अवस्थेत पाहून आश्चर्यचकित झाली, तो तिच्या कुशीत शिरून रडू लागला…. आई मला करोना झाला, मी मरणार… घरचे त्याची समजूत काढत होते पण तो काही ऐकेना. घरच्यांनी त्याला एका नामांकित फिजीशियनकडे घेऊन गेले. त्यांच्या गोळ्यांनी त्याचा ताप अणि सर्दी दोन दिवसात बरी झाली, पण करोना चा विचार त्याच्या मनातून काही केल्या जात नव्हता. त्याची झोप उडाली, भूक मंदावली, इंटरनेट वर सारखा करोना च्या लक्षना बदल वाचन करायचा, टीव्ही वर करो ना मुळे झालेल्या मृत्यूची संख्या बघताच त्याचे डोके सुन्न व्हायचे. घरच्यांनी वारंवार सांगून सुद्धा त्याच्या मनाचे समाधान होत नव्हते. मग घरचे त्याला परत त्या फिजीशियन कडे घेऊन गेले, त्यांनी त्याला तपासले करोना तर राहू द्या पण साधी सर्दी खोकल्याची लक्षणे सुद्धा त्याला नव्हती,पण त्यांनी त्याच्या मनाची स्थिती ओळखली अणि मानसोपचारतज्ज्ञ कडे जाण्याचा सल्ला दिला.’

Illness anxiety disorder (एका विशिष्ट आजारा विषयी असलेली भीती) नावाच्या आजाराची सुरुवात त्याला झाली होती. हा एक मानसिक आजार आहे, ह्यात रुग्णाला एका विशिष्ट आजाराची भीती जडते, त्याच्या डोक्यात 24 तास त्या आजाराचे विचार घोळत असतात. तो वारंवार डॉक्टरकडे जाऊन संबंधित आजारा विषयीच्या तपासण्या करतो. तपासणीचे रीपोर्ट नॉर्मल आले तर थोड्या कालावधी साठी त्याला बरे वाटते, पण नंतर परत त्या आजाराचे विचार येऊ लागतात.
काही दिवसांपूर्वी लोकाना क्षयरोग झाला की काय असे विचार यायचे, नंतर HIV/AIDS झाला की काय असे विचार बरेच दिवस यायचे अणि आता करोना ….
मनाने हळवे, भित्रे अणि चिंता प्रवण लोकांमधे आजारा विषयी च्या अफवा लगेच परिणाम करतात, अनिश्चितता निर्माण करतात. एखादी गोष्ट मानवाच्या आवाक्याबाहेर ची आहे हे समजताच मानवी मनात प्रचंड चिंता निर्माण होते. त्यात आता नक्कीच काही तरी वाईट होईल अशी कुणकुण लागलेली असते. करोना व्हायरस सगळी कडे पसरेल, मी आजारी पडेल, परिणामी मरेल असे वाईट विचार मनात यायला लागतात.

म्हणुन एखादी माहिती सांगत असताना किंवा वाचत असताना त्यातील तथ्य माहीत करणे गरजेचे आहे. त्यावर आपणास चिंता होत असेल तर त्या चिंतेचे समाधान केल्या वरच ती माहिती दुसर्‍यास द्यावी. माहिती मिळवण्यासाठी विश्वसनीय सूत्राचा आधार घ्यावा. त्यात विश्वसनीय लोक असतील किंवा इंटरनेट वरील विश्वासनिय वैज्ञानिक माहिती असेल, आपणास इत्थंभूत माहिती असेल तरच इतरांस सांगावी. आजारा बद्दलची अफवा असेल तर डॉक्टर कडून आपल्या शंकेचे निरसन करावे, डॉक्टरांनी पुढे येऊन अशा अफवांचे खंडन करावे. त्या साठी समाज माध्यमाचा वापर करावा..

माझ्याकडे आलेला अमोल हा समुपदेशन अणि अत्यंत कमी डोस च्या anti-anxiety मेडिसिन ने बरा झाला…..

डॉ रामेश्वर मल्लिकार्जुन बोले
मानसोपचारतज्ज्ञ
7757020981