भ्रष्टाचार निर्मुलन दिव्यांग समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड  : पवन क्यादरकुंटे

अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन समितीची नूतन कार्यकारिणीनी राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद कलाम मुसा, मराठवाडा अध्यक्ष राजू पाटील हसनाळकर, जिल्हाध्यक्ष सय्यद इस्माईल, उपजिल्हाध्यक्ष भाई मैनोदीन शेख, पांडुरंग लंगेवाड मार्गदर्शनाखाली निवड दि. ५ मार्च रोजी करण्यात आले.

भ्रष्टाचार निर्मुलन दिव्यांग समितीची नूतन कार्यकारिणीची निवड पुढील प्रमाणे दिव्यांग मराठवाडा अध्यक्ष म्हणून बालाजी रानवळकर , नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून माधव कदम मानसपुरीकर , सचिव चांदू आंबटवाड, सहसचिव सचिन कांबळे, कार्याध्यक्ष मारोती मंगरुळे, सहकोष्याध्यक्ष साईनाथ बोईनवाड, तर तालुकाध्यक्ष कंधार – पंढरीनाथ वडजे, नायगाव- सय्यद अहेमद राहेरकर , उपाध्यक्ष- गंगाधर सूर्यवंशी, बिलोली- नागोराव साळुंके ,संपर्कप्रमुख – हणमंत सीताफुले, सचिव – शेख अजीम , धर्माबाद – सद्दाम शादूलसाब यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते