फिरते लोकन्यायालयात  41  प्रकरणे निकाली   1 लाख 99 हजार 494 रुपयांची  वसूली  

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : संदीप पिल्लेवाड
  मुखेड तालुका विधी सेवा समितीच्या वतीने सावरगाव पिर येथे गुरुवारी दि. 5 रोजी   फिरते लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. यांस मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यात 41  प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे.  1 लाख 99 हजार 494 रुपयांची  वसूली करण्यात आली आहे .
  या फिरत्या लोक अदालती मध्ये   फौजदारी दाव्यातील 1 व दिवाणी दाव्यातील 2 व दाखल पूर्व प्रकरणे 38 असे एकूण 41  प्रकरणे समोपचाराने  निकाली  काढण्यात आली . तर  या लोक अदालती  प्रकरणात पंचायत समिती मुखेड च्या हद्दीतील ग्रामपंचायत सहभाग घेतला.त्यात त्यांनी घरपट्टी व नलपट्टी चे दाखलपूर्व  प्रकरणात 49हजार 494रु वसुली व इतर प्रकरणातील  1 लाख 50 हजार रुपये. असे एकुण 1 लाख 99 हजार 494 रु वसुल करण्यात आले आहे.
 या फिरते लोक अदालतीसाठी माजी निवृत्त न्यायाधीश श्रीमती कमल वडगावकर उपस्थित  होते. यावेळी त्याचे स्वागत तदर्थ जिल्हा न्यायाधीश एन. पी. त्रिभुवन यांनी केले आहे.  दिवाणी न्यायाधीश  एस . टी. शिंदे ,सह दिवाणी न्यायाधीश एस.जि. शिंदे, 2 रे सह दिवाणी न्यायाधीश  नमृता  बिरादार ,   अभिव्यक्ता संघ अध्यक्ष अॅड. एम. बी. कदम ,अॅड.  डी. जी. हाके व अॅड. प्रकाश आचमारे, अॅड. अंतेश्वर गोगे, अॅड. आनंद जोगदंड,अॅड. अस्लम शेख, अॅड. लक्ष्मण सोमवारे, अॅड. गजानन हिवराळे, अॅड. सय्यद   इतर सदस्य, पोलीस उपनिरीक्षक चित्ते,सहा पोलीस निरीक्षक, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास सरपंच संगमेश्वर देवकते, उपसरपंच गफूर खान पठाण, माजी सरपंच माधवराव मुसांडे, कृष्णाजी कांबळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बालाजी जमजाळ, बालाजी कुद्रे,  जनाबाई कांबळे, बालाजी कबीर, याखूब मोमीन, ग्रामसेवक ए.के.बिरु, एन.एन.गीते, ए.बी. केंद्रे, रेखा अभंगे व ग्रामस्थ उपस्थित होते