कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार : अजित पवार

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (ता. ६ ) सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी निरनिराळ्या घोषणा केल्या. स्थानिकांसाठी रोजगार, नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना प्रोत्साहानपर निधी, दोन लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, औद्योगिक वीज दरात कपात अशा विविध मुद्यांना स्पर्श करणारा अर्थसंकल्प अजित पवारांनी सांगितला

शेतकऱ्यांना हेलपाटे न मारावे लागता सरकारनं कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांना चितामुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्याच्या विकासकामासाठी निधी मिळण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितले. मात्र शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी 22 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच दोन लाखाहून अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार आहे.

ऊसासह इतर पिकांसाठी ठिबक सिंचनासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदान देण्यात येत आहे. सध्या ठराविक तालुक्यांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे. आता तालुक्यातील ही योजना संपूर्ण राज्यात लागू करण्याची घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.