अजित पवारांनी केली मराठवाड्यासाठी ही मोठी घोषणा!

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी मोठी घोषणा केली आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना सुरु राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे.

मराठवाडा वाॅटर ग्रीड योजना बंद करण्याचे संकेत यापूर्वी अजित पवार यांनी दिले होते. त्यामुळे वाॅटर ग्रीड योजनेपासून मराठवाडा वंचित राहतो की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, अर्थसंकल्पात मराठवाडा वाँटरग्रीडसाठी 200 कोटीची तरदूत करण्यात आली आहे.

राज्यात मुख्यमंत्री जलसंधारण योजना राबवण्यात येणार असल्याचंही पवार म्हणाले आहेत. जलसंपदा विभागासाठी 10 हजार 35 कोटींची यासाठी तरतूद करण्यात येणार आहे. राज्यातील भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वाॅटर ग्रीडसाठी देण्यात आलेल्या निधीवरुन टीका केली आहे. 20 हजार कोटी निधी लागत असताना 200 कोटींना निधी देऊन सरकारने मराठवाड्यातील जनतेच्या तोंडाला पाणी पूसले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.