सुधाकर पत्रभूषण पुरस्कारासाठी जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे व अनिल कसबे यांची निवड

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मराठवाडा

नांदेड  : वैजनाथ स्वामी 

प्रबोधनकार ठाकरे स्मृती प्रतिष्ठानतर्फे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी देण्यात येणारा सुधाकर पत्रभूषण पुरस्कारासाठी वर्षे २०१८ चे मानकरी ज्येष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे आणि वर्षे २०१९ साठी आवृत्ती संपादक श्री अनिल कसबे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा संयोजक धर्मभूषण अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांनी केली आहे.

जेष्ठ संपादक श्री सुधाकरराव जी डोईफोडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणा-या या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ५ हजार, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि राजवस्त्र असे आहे. यापुर्वी हा पुरस्कार जेष्ठ पत्रकार प्राचार्य देवदत्त तुंगार, गोवर्धन बियाणी, विजय जोशी यांना देऊन गौरविण्यात आले आहे. गतवर्षी काही अपरिहार्य कारणास्तव नरेंद्र महोत्सव कार्यक्रम होवू न शकल्यामुळे दोन वर्षाचे सुधाकर पत्रभूषण पुरस्कार यावर्षी देण्यात येणार आहेत. 11 व 12 एप्रिल रोजी होणा-या नरेंद्र महोत्सव या कार्यक्रमात हजारो श्रोत्यांसमोर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
अनिल कसबे यांचा अल्पपरिचय :
नांव : अनिल महादू कसबे
जन्मदिनांक : ६ मे १९७२
जन्मगाव : नांदेड
पत्रकारिता सुरूवात : १९९५ पासून कै . अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूवात. शिपाई, शहर प्रतिनिधी, उपसंपादक, जिल्हा प्रतिनिधी, आवृत्ती संपादक दैनिक देशोन्नती.

मिळालेले पुरस्कार : कै.  अनिल कोकीळ पत्रकारिता पुरस्कार, कृष्णाई पत्रकारिता, कै . ए. पी. हिंगोले स्मृती पुरस्कार यासह अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार
छंद : प्रवास, वाचन, लेखन

पंढरीनाथ बोकारे यांचा अल्पपरिचय :
नांव : पंढरीनाथ नामदेवराव बोकारे, संस्थापक नानकसाई फाऊंडेशन
संयोजक : संत नामदेव घुमान यात्रा
जिल्हा प्रतिनिधी, दै गोदातीर समाचार, नांदेड
पत्रकारितेची सुरुवात 1987 पासून..

मिळालेले पुरस्कार :
महाराष्ट्र भूषण पुरस्कार, नवरत्न पत्रकारिता पुरस्कार, आई पुरस्कार, लोकसंवाद पुरस्कार, पंजाब बटाला प्रेस क्लब पुरस्कार, पाणीपत शौर्यतिर्थ पुरस्कार, लक्ष्मणराव गायकवाड निर्भिड पत्रकार पुरस्कार, कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार यांच्यासह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.