ग्राम पंचायत निवडणूकीत नामनिर्देशनपत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र असणे बंधनकारक ; अन्यथा निवडणूक लढवता येणार नाही

ठळक घडामोडी नांदेड नांदेड जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र राष्ट्रीय

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड 

ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूकीत नामनिर्देशनपत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांच्या सहीचे पत्र आले असल्याची माहिती तहसिलदार काशिनाथ पाटील यांनी दिली.

            अनेकांनी शैक्षणिक कागदपत्रासह बाँड व इतर कागदपत्राची तहसिल कार्यालयात जुळवाजुळव करत असताना दिसत होते पण यामुळे अनेकांना निवडणूक न लढवता घरीच शांत बसावे लागेल तर तालुक्यात 24 ग्राम पंचायतची निवडणूक असुन अनेकांजवळ जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने अनेक ग्राम पंचायती बिनविरोध सुध्दा होण्याची शक्यता आहे.