पत्रकार बबलु मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त पाणपोईचे उद्घाटन

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड  : पवन जगडमवार

तन्जीम ए इन्साफचे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार शेख हसनोद्दीन अल्लाऊद्दीन उर्फ बबलु मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्यावतीने पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले.

उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागातुन येणाऱ्या नागरिकांसाठी पंचायत समितीच्या समोर पाणपोईची सुविधा करण्यात आली आहे. वाढदिवसानिमित्त अवाढव्य खर्चास फाटा देऊन सामाजिक बांधिलकीतुन पत्रकार बबलु मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ३ मार्च रोजी पाणपोईचे उद्घाटन मुखेड पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरिक्षक जी.डी.चित्ते यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगरसेवक प्र. दिपक लोहबंदे, नगरसेवक प्रा.विनोद आडेपवार, रामदास पाटील, अॅड.असलम शेख, सामाजिक कार्यकर्ते शंकर वड्डेवार, राजू रणभिडकर, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रियाज शेख, सचिव अनिल कांबळे, अॅड.मिलिंद कांबळे, सचिन इगोले, विजय बनसोडे, पंकज गायकवाड, सय्यद अब्दुल, विशाल, राजमुद्राचे सदस्य, अकबर मुंशी, जाकीर हुसेन, फेरोज पठाण, मोतीपाशा, इस्माईल सर, सह पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक बांधव उपस्थित होते.