पारडी एक्सप्रेस धावली जना, तिने गाठला बालेवाडी पुना         

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या महाराष्ट्र
          लातूर – विभागीय गो गर्ल गो स्पर्धा 100 मी. धावण्याची… मात्र तिच्यासाठी वेळ होती स्वतःला अजमावण्याची.. तिने पाऊल टाकले रणरणत्या उन्हाची पर्वा नाही, पायात चप्पल बूट नाही की डोक्यावर रुमाल नाही ..होता सोबतीला आत्मविश्वास.. दीर्घ घेऊन श्वास.. धावली फक्त डोळ्यात अश्रू घेऊन अन मनात आशा घेऊन समोर दिग्गज मुली ज्यांच्या सोबतीला प्रशिक्षकांचा ताफा.. ती तर बिचारी जि प प्रा शाळा पारडीची पण धीर सोडला नाही हिम्मत एकवटली काही करून आपल्याला पुणे गाठून गाव अन तालुका,जिल्ह्याचे नाव रोशन करायचेच ही उमेद ठेऊन पळली..अन द्वितीय क्रमांक विभागावर पटकावून महाराष्ट्र राज्य स्पर्धा बालेवाडी पुणे येथे दि08 मार्च महिला दिनी होणाऱ्या राज्यस्तरीय गो गर्ल गो स्पर्धेस पात्र ठरली आहे .
                ती ग्रामीण भागातून आलेली जि प प्रा शाळा पारडी ता लोहा येथील कु जना गणेशराव डिकळे.. मु अ किसवे सरांचा विश्वास होताच ही मुलगी राज्यस्तरीय स्पर्धेत खेळणार.. तसा शब्द जनाने वर्गशिक्षक बालाघाटे सर यांना दिला होता.. अन तिला जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या शौर्याच्या कथा सांगून प्रेरणा देणाऱ्या ज्योती कदम, चित्रा गंगाखेडकर, सुरेखा इंगोले, रेखा कदम, सरोजिनी पांचाळ यांचा आनंद मात्र गगनात मावत न्हवता.. तिच्या या यशाबद्दल ग वि अ श्री फंजेवड साहेब, ग शि अ श्री रवींद्र सोनटक्के साहेब, ज्येष्ठ शिक्षणविस्तारअधिकारी श्री सर्जेराव टेकाळे साहेब व केंद्रप्रमुख श्री बाबुराव फसमले यांनी तिचे,मु अ चे व सर्व शिक्षकवृंद यांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेस शुभेच्छा दिल्या आहेत..तिच्या या यशाची दखल घेऊन मा जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी 08 मार्च महिला दिनी तिचा मातेसह सत्कार ठेवला आहे. ती मात्र राज्य स्पर्धेत धावणार आहे आणि इकडे तिची माता साहेबांच्या हस्ते सत्कार स्वीकार करणार आहे.पुत्रिकडून मातेस आणखी यापेक्षा बक्षीस काय हवे?