राजूरा येथील शाळेत पाच गावातील २२२ विद्यार्थ्यांनी दिली दहावीची परिक्षा

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड/ पवन जगडमवार

मुखेड तालुक्यातील मोजे राजूर येथिल क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयात परिक्षा केंद्र क्रमांक ५२४२ या परिक्षा केंद्रावर इयत्ता दहावी चे पाच गावातील २२२ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली.

 

यामध्ये शांति निकेतन विद्यालय आंबुलगा, छत्रपती शाहू विद्यालय बाहेगाव,गजानन माध्यमिक विद्यालय तडखेल, वैभव निवासी अपंग शाळा खानापूर,व क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजूर, या शाळेचा समावेश आसल्याची सविस्तर माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य. व्ही. बी रानशेवार यांनी दिले आहे तर राजूर येथिल परिक्षा केंद्रावर कुठलाही अनुसूचित प्रकार होऊ नये यासाठी पुर्ण काळजी घेण्यात आली होती, यावेळी बेैठे पथक उपस्थित होते बैठे पथकाचे मुंगडे व मंगनाळे व केंद्रसंचालक जी.के. कदम यांनी प्रत्येक हॉलवर लक्ष ठेवून होते, त्यामुळे विद्यार्थ्यांन कडून कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन करताना आढळून आले नाही,अतिशय शांततेत व सुरळीत राजूरा येथिल शाळेत मराठी विषयाचा पहिला पेपर घेण्यात आले यावेळी मुक्रमाबाद पोलीस स्टेशन चे पोलीस कॉन्स्टेबल दोसलवार, गवारे, कोकंटवार यांनी परिक्षा दालनात चौक बंदोबस्त ठेवले होते.