महिला दिनानिमित्त डाॅ भाग्यश्री नरवाडे यांचा होणार विशेष सन्मान 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या
नांदेड : वैजनाथ स्वामी 
दरवर्षी जागतिक महिला दिनी देण्यात येणार कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार व सामाजिक पुरस्कार कार्यक्रमात डाॅ भाग्यश्री वैजनाथ नरवाडे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे मीमांसा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, समीक्षा, पत्रकार प्रेस परिषद, ह्यूमन राईट्स फाउंडेशन व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
दरवर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्वान महिलांचा कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार व सामाजिक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. डाॅ भाग्यश्री नरवाडे यांनी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. तसेच डाॅ नरवाडे यांचे मूळ गाव वसमत तालुक्यातील गुंज असून ज्या गावात आजही एसटी बस जात नाही. अश्या लहानश्या गावात प्रतिकुल परिस्थितीतून गावातील पहिली महीला डाॅक्टर होण्याचा मान मिळवला आहे.
डाॅ भाग्यश्री नरवाडे यांचे वैद्यकीय पदवीचे शिक्षण बीड येथील आदित्य आयुर्वेद महाविद्यालयात झाले तर सध्या नांदेड येथील शासकीय आयुर्वेद  महाविद्यालयात (एम.डी.) पद्युतर पदवीचे शिक्षण घेत आहेत. तसेच वैद्यकीय पद्युतर पदवी एम.डी./एम एस साठी घेण्यात येणाऱ्या आॅल इंडीया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट २०१९ प्रवेश पूर्व परीक्षेत देशात ६०८ वा क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.
२०१६ मध्ये बेंगलोर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील “साधन्ंम “परिषद आयोजित करण्यात आलेल्या क्रार्यक्रमात निवासी प्रशिक्षण घेतले. तसेच राष्ट्रीय आरोग्य संस्था आयोजित वैद्यकिय शिक्षण व प्रशिक्षण कार्यशाळेत सक्रिय सहभाग, सतत ३ वर्ष राज्यस्तरीय वैद्यकीय प्रश्नोतरी स्पर्धेत सहभाग आणि विजेती झाल्या आहेत.
डाॅ भाग्यश्री नरवाडे यांनी सामाजिक कार्य करत असताना महिला बाल आरोग्य, स्त्री भ्रूण हत्या, कुटंबाचे आरोग्य स्त्रीच्या हाती, गर्भवतीचा आहार, गर्भवतीचा विहार आणि आयुर्वेद जनजागृती, आपले आरोग्य आपल्या हातात कार्यशाळेचे आयोजन, ध्यान साधना व स्वअनुभुतीचे महत्व ग्रामीण रुग्णालयात, प्रथमोपचार आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊन  ग्रामीण भागातील महिलांमध्ये जनजागृती करण्याचे महत्वपूर्ण कार्य केले.