सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना निरोप

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : प्रतिनिधी

मुक्रामाबाद पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक म्हणून सेवा देणारे कार्यशिल,कार्यत्पर,कर्तव्यनिष्ठ असे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मा श्री उमाकांत तुकाराम पाटील जाधव हे ता.२९ फेब्रुवारी २०२० रोजी वयाच्या ५८ वर्ष पूर्ण केले त्यामुळे ता.२९ रोजी नांदेड येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रथम त्यांना निरोप समारंभ पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.व सपत्नीक सत्कार करुन पुढील वाटचालीस पोलीस अधीक्षक यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यालयात मुक्रामाबाद पोलीस ठाण्या मधुन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या सेवेतून ३८ वर्षे सेवा पुर्ण करून नियमित वयोमानाने प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्या बद्दल,मुक्रामाबाद पोलीस स्टेशनच्या वतिने निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करून सेवानिवृत्त होणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचे वस्त्र शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आले व पुढील आयुष्यासाठी मनस्वी शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला.

यावेळी मुक्रामाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे साहेब,पोलीस उपनिरीक्षक वाघमारे,ए एस आय केंद्रे,गायकवाड,एस सी सुरनर,कागणे,अल्लुरे,गिते,पी सी जळकोट्टे नरबाग,पवार,एल पी सी मरेवाड,इंदुरे,शेख,हालसे,लक्ष्मीकांत पा जाधव,लोकमतचे युवा पत्रकार बालाजी शिंदे उंद्रीकर, मंगेश जाधव,अक्षय गोणारे व कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांनी आपल्या कार्यकाळात नांदेड,कंधार,बिल्लोली,रामतीर्थ,कोंडलवाडी,मुक्रामाबाद येथे सेवा बजावली.