जीवनातील उचित बदलामुळे  ह्रदयरोग टाळू शकतो – डॉ. श्रीवल्लभ कार्लेकर 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : संदीप पिल्लेवाड
         बदललेल्या जीवनशैलीत होणाऱ्या बदलामुळे हृदयरोगाचा धोका तीव्र बनत चाललेला असून ह्रदयरोग झाल्यानंतर रोगी व नातेवाईक तणावग्रस्त होण्याऐवजी वेळीच प्रतिबंध व उपाय करणे नितांत गरजेचे आहे. माणसाच्या जीवनातील उचित बदलामुळे आपण ह्रदयरोग टाळू शकतो असे मत शहरातील जय बजरंगबली व्यायाम शाळेच्या वतीने हृदयरोग जनजागरण व सत्कार सोहळा आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध तज्ञ डॉ. श्रीवल्लभ कार्लेकर यांनी आपल्या व्याख्यानात म्हणाले.
          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष बाबूराव देबडवार हे होते . विशेष सत्कारमूर्ती डॉ. श्रीवल्लभ माधवराव कार्लेकर ( देशपांडे ) व डॉ संतोष अंबादास शिरडकर यांचे विशेष आकर्षण होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुखेड भूषण डॉ.दिलीपराव पुंडे , डॉ.अशोक कौरवार , रमेश मेगदे तसेच व्यासपीठावर व्यायाम शाळेचे अध्यक्ष शिवकुमार महाजन आणि सचिव मारोती मामीलवाड यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाले. देशाच्या सीमेवर शहीद जवान ,  स्व. संतोष कोरे , स्व.डॉ. शिवानंद हिरेमठ ,  दिल्ली हल्ल्यातील मृत व्यक्तीसाठी श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पांपटवार व संयोजकाचे मनोगत मारोती मामीलवाड यांनी व्यक्त केले.

         व्याख्यानासाठी ” तारुण्यातील हृदयविकार : कारणे ,  लक्षणे व उपचार ” या विषयावर डॉ.शिरडकर यांनी व्याख्यान देताना हृदयविकार होण्याची कारणे , त्याची लक्षणे , त्यावर प्रथमोपचार ,  विविध तपासण्या ,  रोगनिदान , उपचार पद्धती सांगितले.


                    सीआरपीएफ मधून सेवानिवृत्त झालेले जवान गजानन  मदनवाड व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कडमपल्ले बालाजी यांचे सत्कार करण्यात आले. मनोगतामध्ये केमिस्ट रमेश मेगदे यांनी अकरा हजाराची निधी दान दिले. यावेळी डॉ.अशोक कौरवार , मुकेह्दभूषण डॉ. दिलीप पुंडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.चंद्रकांत एकलारे नरंगलकर व आभार प्रदर्शन धनंजय मुखेडकर यांनी केले तर  या कार्यक्रमास  बहुसंख्येने नागरिक रात्री उशिरापर्यंत मंत्रमुग्ध होऊन ऐकण्यासाठी उपस्थित होते .