दहावी बोर्ड परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात पार पाडावी– मुख्य कार्यकारी अधिकारी.

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या महाराष्ट्र

नांदेड : वैजनाथ स्वामी 

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता १० वी च्या सन २०२० च्या परीक्षा दि.०३-०३-२०२० ते २३-०३-२०२० या कालावधीत सुरु होणार आहेत. सदरील परीक्षेस जिल्हाभरातून एकूण पन्नास हजार परीक्षार्थी परीक्षा देत आहेत त्या अनुषंगाने जिल्हा दक्षता समिती ची बैठक मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. ०१-०३-२०२० रोजी जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पार पडली. सदर बैठकीस मा.जिल्हाधिकारी श्री डॉ.विपिन यांनी या वर्षीच्या १० वी परीक्षा पूर्णतः कॉपी मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी संवेदनशील व उपद्रवी केंद्रावर बैठे पथक, भरारी पथक व सर्व केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरणासाठी तंत्रास्नेही व्यक्तीची नियुक्ती करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. एखाद्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्यास संबंधित केंद्रसंचालक व पर्यवेक्षक यांच्या विरुद्ध प्रशासकीय करण्यात येईल तसेच गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही देखील करण्यात येईल. एखाद्या परीक्षा केंद्रावर सतत गैरप्रकार होत असल्यास संबधित परीक्षा केंद्र तात्काळ बंद करण्यात येईल.सदरील परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचे व सर्व पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांना कर्तव्याची भान ठेवण्याबद्दल मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
सदर बैठकीस मा.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता समिती नांदेड, मा.जिल्हा पोलीस अधीक्षक, प्राचार्य डायट शिक्षणाधिकारी (मा.) शिक्षाणाधिकारी (प्रा.) उपशिक्षणाधिकारी (मा.) जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण), परिरक्षक व केंद्रसंचालक (१५७) यांची उपस्थिती होती.