आजचे राशी भविष्य दिनांक 2/03/2020

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

मेष:-कलासक्त दृष्टीकोन वाढीस लागेल. मैत्रीचे नवीन संबंध जुळून येतील. आवडीचे पदार्थ खाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. आनंदी दृष्टीकोन बाळगाल.

वृषभ:-दिवस मनाजोगा घालवाल. काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवाल. तुमची उत्तम छाप पडेल. जि‍भेवर साखर ठेवून बोलाल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

मिथुन:-मानसिक चंचलता जाणवेल. मैत्रीचे संबंध घट्ट होतील. कामात स्त्रियांची मदत मिळेल. वागण्यात शालीनता दाखवाल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

कर्क:-कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल. गोड बोलून कामे साध्य करता येतील. कलागुण उत्तमरीत्या प्रकट होतील. घराची सजावट कराल. व्यवसायात समाधानकारक वातावरण राहील.

सिंह:-कामात स्थिरता ठेवावी. धार्मिक वृत्तीत वाढ संभवते. इतरांना आनंदाने मदत कराल. पित्तविकार बळावू शकतात. इतरांच्या विश्वासास पात्र व्हाल.

कन्या:-काही कामे कमी श्रमात पार पडतील. अचानक धनलाभ संभवतो. रेस, सोडत यातून लाभ संभवतो. बौद्धिक ताण राहील. आपलेच म्हणणे खरे कराल.

तूळ:-वैवाहिक सौख्यात वाढ होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. शेअर्स मधून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधानी राहाल. कौटुंबिक बाबींकडे दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक:-जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल. भागीदारीत खुश राहाल. संपर्कातील लोकांचा जिव्हाळा वाढेल. इतरांच्या मताचा आदर करावा. हट्टीपणा दूर सारावा लागेल.

धनू:-खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. फार अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. तुमचे धाडस वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

मकर:-मनातून निराशा दूर सारावी. अडथळ्यातून मार्ग काढावा. खर्चाचे योग्य नियोजन करावे. मुलांचा आनंद द्विगुणित होईल. उधारीचे व्यवहार सावधानतेने करावेत.

कुंभ:-मैत्रीत कटुता येणार नाही याची काळजी घ्यावी. उगाच चिडचिड करू नका. आपली संगत एकवार तपासून पहावी. जवळचा प्रवास मजेत कराल. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल.

मीन:-आवडत्या लोकांमधे रमून जाल. बोलण्यात मधाळपणा जपाल. कामाच्या ठिकाणी संबंध जपाल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. इतरांवर आपली उत्तम छाप पाडाल.