जनता हायस्कूलचे मूख्याध्यापक बालाजीराव काकडे सरांचा निरोप समारंभ उत्साहाने साजरा.

कंधार नांदेड जिल्हा

कंधार – प्रभाकर पांडे

जनता शिक्षण प्रसारक मंडळाची संस्था जनता हायस्कूल व तिथे तीस वर्षे अविरत शिक्षणाची सेवा देणारे मा.बालाजीराव काकडे सरांना संस्थेच्या वतीने निरोप देण्यात आला .

त्यावेळी अध्यक्ष मा.ओमप्रकाश देशमूख उपाध्यक्ष .मा.नागोराव देशमूख सचिव.शिवकूमार देशमूख तंटामूक्ती अध्यक्ष मा.बाबूराव देशमूख,मा.सचिन पाटील चिखलीकर,पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी मा.संजय देशमूख,पंचायत समिती सदस्य मा.सत्यनारायण मानसपूरे,माजी वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.बासीतअली साहेब,माजी मूख्याध्यापक मा.काशिनाथराव देशमूख सह जि.प.शाळा मूलांचे व मूलींचे मूख्याध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते