भिवंडीत नागरिकांनी घडवली भाजी विक्रेत्यास अद्दल, गटारीतील भाजी काढून विकत होता संतापलेल्या नागरिकांनी भाजी विक्रेत्याची हातगाडीवरील भाजी फेकून दिली

ठळक घडामोडी महाराष्ट्र

भिवंडी | गायत्री नगर परिसरात एक भाजी विक्रेता गटारीत पडलेली भाजी काढून विकत असल्याने नागरिकांचा राग अनावर झाला आहे. नागरिकांनी या भाजीवाल्याला पकडून चांगलाच धडा शिकवला आहे. गटारीतून काढलेली भाजी नागरिकांनी फेकून दिली आहे. या गोष्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

गायत्री नगर परिसरात भाजीविक्रेता जात असताना त्याची हात गाडी चेंबरमध्ये मध्ये अडकली होती. चेंबरमध्ये हातगाडी अडकल्यानंतर त्याची काही भाजी गटारीत पडली होती. त्यानंतर भाजी विक्रेत्यांने गटारीतून भाजी काढून थेट हात गाडीवर ठेवली व आणि विकण्यासाठी निघाला असता तेथील स्थानिक नागरिकांना राग अनावर झाला. नागरिकांनी हातगाडीवाल्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने या गोष्टीकडे कानाडोळा केला. त्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी भाजीविक्रेत्याची हातगाडीवरील भाजी फेकून दिली. त्यामुळे या हातगाडीवाल्याला चांगलीच अद्दल घडली आहे. आता यापुढे असे कृत्य करण्यास नसल्याचे भाजीविक्रेता म्हणत होता