सोनखेड अत्याचाराच्या निषेधार्थ रास्ता रोको ; नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मराठवाडा महाराष्ट्र

नांदेड : वैजनाथ स्वामी

लोहा तालुक्यातील सोनखेड येथे 5 वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आला, यातील नराधमास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी व घटनेचा निषेध म्हणून सोनखेड येथे महामार्गावर 28 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

सोनखेड येथील घटनेतील सुग्रीव मोरे या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे.रास्ता रोको आंदोलन दरम्यान संतप्त नागरिकांनी आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी केली .दरम्यान पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के यांच्या सह चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.