बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास तात्काळ अटक करा -देवा फाउंडेशन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या
नांदेड : वैजनाथ स्वामी 
           लोहा तालुक्यातील सोनखेड येथील एका बालिकेचे अपहरण करून त्या बालिकेवर अत्याचार करण्यात आला.या प्रकरणातील मुख्य आरोपीस अद्याप अटक झाली नसल्याने देवा फाउंडेशनच्यावतीने आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ.विपीन  इटणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून आरोपीस अटक न झाल्यास नांदेड बंदचा इशारा देवा फाउंडेशनने दिला आहे.
         नांदेड जिल्ह्यातील सोनखेड येथे  बुधवारी अत्यंत दुर्देवी घटना घडली असून त्या घटनेचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटत आहेत.
या प्रकणी अद्याप मुख्य आरोपीस अटक झाली नाही.या आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी देवा फाउंडेशनचे मंजीतसिंघ चव्हाण,मनमित सिंघ कुंजीवाले, साहिल मूलंगे,श्रीनिवास ककुरले,रंजीतसिंघ खालसा, शुभम मोरे,रणज्योतसिंघ मल्ली, जसप्रीतसिंघ निर्मले, अभिषेक सोनटक्के, आकाश पदरे,शुभम पटवे,विरेंद्र विजापुरे, यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. आरोपीस अटक न झाल्यास नांदेड बंद करण्याचा इशारा देवा फाऊंडेशनने दिला आहे.