नांदेड महसूलची रेती चोरांवर धाडशी कारवाई ; 100 हून अधिक तराफेची होळी , साहित्य केले जप्त

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या महाराष्ट्र

नांदेड : वैजनाथ स्वामी

गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्या रेती चोरांना नांदेड तहसीलच्या महसूल विभागाने दणका दिला असून आज केलेल्या मोठ्या कारवाईत १०० हून अधिक तरफ्यांची होळी करण्यात आली.

नांदेड शहरालगत असलेल्या कौठा व असर्जान परिसरातील गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करण्यात येत असल्याची माहिती नांदेडच्या महसूल विभागाला मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आधारे उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, तहसीलदार मुगाजी काकडे, मंडळ अधिकारी के एम नगरवाड, अनिल धुलगुंडे, तलाठी मनोज देवणे, माणिक बोधागिरे, रवी पल्लेवड, राहुल चव्हाण, आकाश कांबळे, मंगेश वांगीकर, सापो नी सुरेश थोरात, पोका झुंजारे, गवाणकर, यांच्या पथकाने मोठी कारवाई करत शंभरहून अधिक तराफे जाळून खक केले. यावेळी रेती उपासासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.