पदवीच्या विद्यार्थ्यांचे एकाच दिवशी दोन पेपर घेण्याचा विद्यापीठाचा मनमानी निर्णय तात्काळ मागे घ्या – एसएफआय

ठळक घडामोडी नांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

स्वा.रा.ती.म. विद्यापीठावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मा.कुलगुरु यांना निवेदनाद्वारे देण्यात आले

मुखेड / पवन जगडमवार

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने यंदा बी.ए.,बी.एस.सी व बी.कॉम अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्र परिक्षेत एम सी क्यू परिक्षा पध्दत बंद केले व एकाच दिवशी एकच पेपर घेण्याची परिक्षा पध्दत बंद करून थिअरी पँटर्न पध्दतीनेच परिक्षा घेत एकाच दिवशी दोन पेपर घेण्यास सुरुवात केली आहे.

पंरतु या निर्णयाने नांदेड जिल्ह्यातील पदवीधर विद्यार्थ्यांना या परिक्षा पध्दतीचा मोठा फटका बसला आहे ,एकाच दिवशी दोन पेपर असल्याने विद्यार्थी गोंधळून गेले होते,एका पेपर आड एक पेपर राहीले असते तर विद्यार्थ्यांना परिक्षेच्या कालावधीत एक दोन दिवसाचा वेळ अभ्यास करण्यासाठी मिळाले असते,पंरतु एकाच दिवशी दोन पेपर घेत असलेल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक शारीरिक मानसिक ताणतणावा खाली परिक्षा देण्याची वेळ आली आहे. आणि एम सी क्यू पध्दत बंद झाले त्यामुळे पुर्ण पेपर थिअरी पध्दतीने सोडवायचे असल्याने विद्यार्थ्यांना वेळ ही पुरेसा होत नाही त्यामुळे विद्यार्थी चांगले च तणावाखाली आले होते या जीवघेण्या परिक्षा पध्दतीमुळे मानसिक, शारिरीक व शैक्षणिक नुकसान होताना दिसून येत आहे.

त्यामुळे बी.ए ,बी.एस.सी, बी.कॉम.या तिन्ही शाखेची टक्केवारी घसरली असुन जवळपास बी.ए.अभ्यासक्रमाला चार जिल्ह्यातील १५ हजार ४३७ विद्यार्थ्यांपैकी केवळ ६९४ विद्यार्थीच उतीर्ण झाले आहेत, असे एसएफआय नांदेड शहर कमिटीचे म्हणे आहे.

एसएफआय या विद्यार्थी संघटनेने त्यांच्या निवेदनातुन व आंदोलनाच्या माध्यमातुन परिक्षा पध्दतीत बदल करू नये असे सांगितले होते मात्र वारंवार सांगुन सुध्दा विद्यापीठाने परिक्षा पध्दतीत वेगवेगळे प्रयोग करण्याच्या नादातुन विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

तर आता परिक्षेचे वेळापत्रक जाहिर केले आहे आणि त्या वेळापत्रकानुसार रेगुलर चे पेपर आणि बॅकलॉक चे पेपर एकाच दिवशी घेण्यात येणार असल्यामुळे आता, ज्या विद्यार्थांनचे एक दोन पेपर बॅक राहीले आहेत,त्या विद्यार्थाला बॅक लॉक चे आणि रेगलूरचे पेपर एकदाच द्यावे लागणार आहे त्यामुळे आता बॅकलॉक विषयाच्या विद्यार्थ्यांना चार पेपर एकदाच देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे याचा एसएफआय नांदेड शहर कमिटी तीव्र निषेध करते. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यासोबत खेळ खेळू नये व असे चुकीचे निर्णय घेऊ नये, हा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी एसएफआय विद्यार्थी संघटना करत आहे,आणि हा निर्णय मागे घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावे,अन्यथा एसएफआय नांदेड शहर कमिटीच्या वतीने हजारो विद्यार्थ्यांन्या घेऊन विद्यापीठावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दि २५ फेब्रुवारी २०२० रोजी मा.उप कुलसचिव यांच्या मार्फत मा.कुलगुरु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांना आदोलन करण्याचा इशारा देण्यात आले यावेळी विद्यार्थी संघटनेचे शहर अध्यक्ष स्वप्निल बकत्तुरे, शहर सचिव शंकर बादावाड, रत्नदिप कांबळे, अनिल बुक्तरे,रोहीत त्रिभूवन, कैलास लोहबंदे,जुबेर शेख आदींची उपस्थिती होती


पेपर च्या बदलेल्या पॅटर्नामुळे आम्हाला खूप अडचणी सहन करावे लागत आहे, एकाच दिवशी दोन्ही पेपरचा अभ्यास त्यामुळे सगळ गोंधळ होत आहे, त्याचबरोबर दोन्ही पेपर लिहण्यासाठी वेळ पण पुरत नाही, आणि पेपर लिहते वेळेस हात पण खूप दुःखत आहे, म्हणून कुलगुरू सरांना विनंती आहे की हे पॅटर्न बदलून जे एका दिवशी एकाच पेपरच पॅटर्न द्या जे की पहिले होते.

विद्यार्थीनी – पाटील मयुरी बी. एस.सी तृतीय वर्ष शाहिर महाविद्यालय मुखेड 


पेपर लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ पुरेसा होत नाही, एका दिवशी दोन दोन पेपर चा अभ्यास होत नाही, एका दिवशी एक च पेपर ठेवा लक्ष विचलित होत आहे, एका दिवशी दोन पेपर सोडवण्याची मानसिक तयारी होत नाही, एक दिवशी दोन पेपर सोडविण्याची कोणाची ही तयारी नाही त्यामुळे एक पेपर एकाच दिवशी ठेवावे –

मालेमा गंगाधर आरसे बी ए तृतीय वर्ष यशवंत महाविद्यालय नांदेड


एका दिवशी दोन पेपर आसल्यने पेपरच्या आधी कोणत्या पेपरचा अभ्यास करवा हे कळत नाही. त्यामुळे कुलगुरू सरांना विनंती आहे की एका दिवशी दोन पेपर घेण्याची पद्धत रद्द करावे आणि एक च पेपर घ्यावे –

रेणुका ईबिदवार बी.ए प्रथम वर्ष धुंडा महाराज महाविद्यालय देगलूर


एकाच दिवशी दोन पेपर घेत असलेल्यामुळे पुरेसा वेळ मिळत नाही पेपर पुर्ण थिअरी पध्दतीने असल्याने खुप लिहावे लागत आहे एक पेपर लिहून झाल्यावर लगेच दुसरे पेपर सोडवण्यासाठी हाताला खूप त्रास होत आहे ,परिणामी दुसरा पेपर लिहताना हात खुप दुखत आहे,त्यामुळे दुसरा पेपर सोडवावे वाटत नाही, तरी मा. कुलगुरू सरांना विनंती आहे की एकाच दिवशी एकदाच दोन पेपर घेण्याची परिक्षा पध्दत तातडीने रद्द करावे, आणि पुर्वी प्रमाणे परिक्षा घेण्यात यावे आणि एम सी क्यू पध्दत परत चालू करावे, आणि परिक्षा सेंटर अगोदर प्रमाणे ज्या त्याच महाविद्यालयात ठेवावे,परिक्षा सेंटर बदलू नये कारण दुसय्रा कॉलेज मध्ये जाऊन परिक्षा देण्साठी अडचण निर्माण होत आहे, बॅकलॉक चे पेपर देत असताना हॉल सापडत नाहीत, वेळेवर प्रश्न पत्रिका देत नाहीत,त्यामुळे खुप त्रास होत आहे, –

विद्यार्थी पवन गंगाधर जगडमवार, शाहीर कॉलेज मुखेड


सलग दोन पेपर एकाच वेळी तसेच दोन पेपर एका दिवशी असल्याने पुरेसा वेळ अभ्यासाला मिळत नाही या कारणाने पेपर पुर्ण सोडविणे शक्य नाही.तसेच टक्केवारी वर याचा दुष्परिणाम होतो दोन्ही पेपर चे विषय व नाव (भाग)अर्थातच अभ्यासक्रम हा भिन्न असून विद्यार्थी हा गोंधळलेल्या आवस्थेत असतो वर्षभर विद्यार्थी अभ्यास करून देखील दोन्ही पेपर एकाच वेळी असल्याने तो संभ्रम आवस्थेत असतो व परीक्षेची भिती तसेच न्यूनगंड निर्माण होऊन विद्यार्थी मानसिक रित्या दुर्बल होतो.

        शिवानंद मंगलगे बी.एस.सी प्रथम वर्ष शाहिर कॉलेज मुखेड