सोनखेड येथे चिमुरडीवर अपहरण करून अत्याचार सोनखेड पोलिसात गुन्हा दाखल 

ठळक घडामोडी नांदेड नांदेड जिल्हा महाराष्ट्र लोहा

 

लोहा:-इमाम लदाफ

काही दिवसा पुर्वी राज्यात घडलेल्या घटने नंतर राज्यभर संतत्प प्रतिक्रीया उमटत अतानाच माणुसकीला लाजवेल अशी घटना सोनखेड शिवारात घडली. एका पाच वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दि. 26 रोजी सकाळी उघडकीस आली.

लोहा तालुक्यातील सोनखेड येथे दि. 25 रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीला अज्ञात आरोपीने पळवून नेले. बराच वेळ झाले चिमुरडी घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी शेजारी-पाजारी सर्वत्र शोधाशोध केली मात्र ती मिळून आली नाही. याबाबत चिमुरडीचे पालक नातेवाईक यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनीही गाव परिसरात शोध घेतला मात्र तपास लागला नाही रात्री उशिरा अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि. 26 रोजी सकाळी साडे आठ ते नऊ वाजे सुमारास दगडगाव रस्त्यालगत सोनखेड पासून अर्ध्या किमी अंतरावरील एक शेतात सदर चिमुरडी नग्नावस्थेत रडत असल्याचे कांही शेतकऱ्यांना दिसली त्यांनी सदर चिमुरडीस तिच्या घरी आणून नातेवाईकांच्या हवाली केले. नातेवाईकांनी चिमुरडीस सोनखेड पोलिसात आणल्यानंतर तिला वैदयकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. चिमुरडी केवळ पाच वर्षांची असल्याने ती घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच तिच्या कानातील सोन्याच्या काड्याही आरोपीने काढून घेतल्याचे सांगण्यात आले.

याप्रकरणी सोनखेड पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात वाढ करून बाल लैंगिक अत्याचार (पोस्को) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सोनखेड येथे जिल्हा पोलीस अधीक्षक मगर यांनी भेट दिली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील तळ टोकून होते. तसेच आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक तयार करून रवाना करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


 

▪ सदरील घटनेच्या निषेधार्थ सोनखेड येथील व्यापारपेठ बंद ठेवण्यात आली होती. आरोपींचा तात्काळ शोध घेऊन अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सोनखेड येथील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन नांदेडवरून अधिकचा फौजफाटा मागविण्यात आला असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.