विधान परिषद कॉंग्रेस प्रतोदपदी आ.अमरनाथ राजूरकर

नांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड :  वैजनाथ स्वामी 

नांदेड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष व विधान परिषद सदस्य आ.अमरनाथ राजूरकर यांची विधान परिषदेतील काँगे्रस पक्षाच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे त्यांना आता विशेष दर्जा मिळणार आहे.

कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ सचिवाकडे या संदर्भात शिफारस केली असून यामध्ये आ.अमरनाथ राजूरकर यांच्यावर पक्षाच्या वतीने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मागील अनेक वर्षापासून माजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आ.अमरनाथ राजूरकर काँगे्रस पक्षाचे एकनिष्ठेने काम करीत आहेत.

त्यांच्या या कामाची दखल घेत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या शिफारसीनुसार आ.राजूरकर यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या नावामध्ये विधानसभेचे मुख्य प्रतोद म्हणून आ.सुरेश वरपूरकर तर प्रतोद म्हणून आ.प्रणीती शिंदे तर विधान परिषदेच्या मुख्य प्रतोदपदी भाई जगताप यांची आ.अमरनाथ राजूरकर यांच्यासोबतच निवड करण्यात आली आहे.