दिल्लीत पुन्हा हिंसाचार 9 जणांचा मृत्यु तर 135 जण जखमी हिंसाचारात 9 जणांचा मृत्यु, मृतामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश

ठळक घडामोडी मराठवाडा महाराष्ट्र राष्ट्रीय

दिल्ली |  सीएए आणि एनआरसी वरून दिल्लीत हिंसाचार सुरूच आहे. आतापर्यंत या हिंसाचारात 9 जणांचा मृत्यु झाला आहे. तर 135 जण गंभीर जखमी झाले आहेत. पूर्वोत्तर दिल्लीतील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की या भागात कलम 144 लागू करण्यात आली आहे. तसेच परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. कालपासून या हिंसाचारास सुरूवात झाली होती. सीएए आंदोलक आणि समर्थक समोरासमोर आले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली होती. या दगडफेकीत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यु झाला होता. आज परत एकदा मोठा हिंसाचार उफळला असून आतापर्यंत या हिंसाचारात 9 जणांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे.