महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ मुखेडात भाजपचे एल्गार महाधरणे आंदोलन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत  असे म्हणत महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी मुखेडच्या वतीने  आ.तुषार राठोड  यांच्या  नेतृत्वाखाली दि २५ रोजी मुखेड तहसिल कार्यालय समोर एल्गार महाधरणे आंदोलन करण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्या व गेल्या महिन्याभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपा तीव्र निषेध करण्यात आला.

 

यावेळी माजी आ. अविनाश घाटे, भाजपा नेते देविदास राठोड. भाजपा तालुकाध्यक्ष डॉ विरभद्र हिमगिरे, लक्ष्मण पाटील खैरकेकर, डॉ माधव पाटील उच्चेकर,   राजु घोडके, अशोक गजलवाड, गोटु पाटील बिल्लाळीकर, किशोर चौहान यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

 

(छाया : चरणसिंह चौहान मुखेड)