केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा नांदेड जिल्हा दौरा

नांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : वैजनाथ स्वामी

– केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे मंगळवार, दिनांक 25 व बुधवार, दि. 26 फेब्रुवारी, 2020 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
मंगळवार, दि. 25 फेब्रुवारी, 2020 रोजी 10-30 वाजता परभणी येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. 12-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आगमन. 12-30 वाजता नांदेड येथून लोहाकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 1-00 वाजता लोहा गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थिती. 3-15 वाजता लोहा येथून नांदेडकडे प्रयाण. 4-00 नांदेड येथे आगमन. 4-15 वाजता पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. व नांदेड येथे मुक्काम बुधवार, दि. 26 फेब्रुवारी, 2020 रोजी उदगीरकडे प्रयाण करतील