शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, दिवसा वीज द्या , यंदाचा पीकविमाही मंजूर करा – कलंबरकर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन  क्यादरकुंटे           

    सातबारा कोरा करा, शेतीला दिवसा 12 तास लाईट द्या, या वर्षीचा पीकविमा मंजूर करा व लाल्या रोगांमुळे नुकसान झालेल्या हरभरा पिकांची नुकसानभरभाई द्या अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार काशीनाथ पाटील यांना युवा रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी दि. २४ रोजी दिले. 

हे सरकार स्थापन होत असतांना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला होता पण त्यांनी तो अद्याप पाळला नसून शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी लाईटची वेळ ही रात्रीची आहे याचा शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे त्यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी दिवसा 12 तास लाईट देण्याचा निर्णय घ्यावा व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकनुकसानीचे पंचनामे करण्याचा नियम असूनही,या वर्षीच्या पीकनुकसानीचे विमाकंपणीकडून पंचनामे करण्यात आले नाहीत.कायदाचा नियमभंग केलेल्या विमाकंपणीवर गुन्हा दाखल करा किंवा शेतकऱ्यांना या वर्षीचा पीकविमा मंजूर करावे व रब्बी हंगामातील हरभरा या पिकावर लाल्या व तांबोरा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली .


         यावेळी शिवशंकर पाटील कलंबरकर , महेताब शेख,संजय पिल्लेवाड,दत्तात्रय तीपणे , शिवानंद मंगलगे,हाणमंत गोपनर,कपिल दिंडे,काशिनाथ इंदूरे,उत्तम देशमुख,संदिप शिंदे,राम निलकंठे आदी उपस्थित होते.