छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

नांदेड जिल्हा हदगाव

देवानंद हुंडेकर 

स्वराज्य संकल्पक कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 390 वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या तामसा येथील राष्ट्रमाता जिजाऊ माती परीक्षण केंद्रात साजरा करण्यात आला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले,संस्थेचे चेअरमन भागवत देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला, शिवजन्मोत्सव निमित्ताने संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माती परीक्षण विषय माहीती पत्रक व जमिनीतुन माती काढणे विषयाचे प्रशिक्षण संस्थेच्या वतीने मोफत व शेतकऱ्यांना परवडेल अशा दरांमध्ये माती परीक्षण करून देण्याची ग्वाही यावेळी संस्थेचे चेअरमन भागवत देवसरकर यांनी दिली. यावेळी व्यापारी असोसिएशनचे गजानन लाभसेटवार,तिनू शेठ अग्रवाल,प्रकाश पवार, ज्ञानेश्वर कोठूळे,योगेश पवार पाटील पाथरडकर,संस्थेचे कर्मचारी संदीप जाधव,अनिल देवसरकर, नंदू पाटील,अमोल देवसरकर आदी उपस्थित होते.