मुखेडमध्ये डॉ . विरुपाक्ष शिवाचार्य यांचे कार्य बारा वर्षाचे नसून बाराशे वर्षाचे – राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर मुखेड येथे डॉ विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांचा द्वादश पट्टाभिषेक महोत्सव उत्साहात साजरा अनेक मठाधिपतींची उपस्थिती, तालुक्यासह अनेक भागातून मोठया संख्येने भक्तगण उपस्थित शोभायात्रेत लेझीम पथक , कलशधारी महिला, उंटधारी, भजन , कीर्तनाने मुखेड नगरी दुमदुमली

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
     लोककल्याणाचे अद्भुत कार्य करणारे  डॉक्टर विरुपाक्ष गणाचार्य महाराज यांचे गणाचार्य मठ संस्थान असून मागील बारा वर्षांपासून पाहता मठाची अवस्था ,  समाजाची अवस्था खूप बऱ्यापैकी सुधारली असून  हे कार्य बारा वर्षाचे नसून तर बाराशे वर्षाचे कार्य डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य गणाचार्य मठ संस्थान यांनी केलेले आहे असे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांनी मुखेड येथे डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य गणाचार्य महाराज यांच्या द्वादश पट्टाभिषेक महोत्सव  सोहळ्यामध्ये व्यक्त केले
                मुखेड येथील गणाचार्य मठ संस्थानचे मठाधिपती डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांना मुखेड येथे येऊन बारा वर्ष पूर्ण होत असल्याने या निमित्य द्वादश पट्टाभिषेक महोत्सव श्री नवचंडी महायज्ञाचे आयोजन व  दि २३ रोजी  सायंकाळी सहा वाजता कवटीकवार जिनिंग येथे धर्मसभा झाली.
          यावेळी गणाचार्य मठ संस्थानचे मठाधिपती डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज व श्री प्र 108 राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा मुखेड नगरीच्या वतीने व सर्व मठाधिपती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांची मनोगते झाली.
          तत्पूर्वी सकाळी 11 वाजता शहारातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत लेझीम पथक , कलशधारी महिला, भजन , कीर्तन व उंटधारी यास सहभागी झाली होते. या कार्यक्रमानिमीत्त मुखेड नगरी  सजल्यासारखे चित्र दिसत होते. तर या शोभायात्रेवर मुस्लिम बांधवांनी व मुखेड काँग्रेसच्या वतीने केली पुष्पवृष्टी करण्यात आली.
      या धर्मसभा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री प्र 108 राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, मुदखेड येथील रुद्रमुनी शिवाचार्य, महाराज, अंबाजोगाई येथील शंभुलिंग शिवाचार्य महाराज, सोनपेठचे मठाधिपती नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, हाणेगाव येथील शंकरलिंग शिवाचार्य महाराज, नागठाण येथील महाराज,  येवती मठाचे नराशाम महाराज, बारुळचे नामदेव महाराज, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर , माजी आ. अविनाश घाटे ,  सुभाष रावजी साबणे, नगराध्यक्ष बाबुराव देबडवार,मुखेड भुषण डॉ दिलीप पुंडे, प्रवीण पाटील चिखलीकर, खुशाल पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
         तर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मुखेड –  कंधार विधानसभेचे आ.डॉ. तुषार राठोड हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ माधव पाटील उचेकर यांनी केले. सुप्रसिद्ध विचारवंत विवेक घळसासी यांचे अध्यात्मिक विषयवार व्याख्यान झाले व गणाचार्य मठ संस्थानचे मठाधिपती डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रकाशपर्व या अंकाचे व सा.लोकसंकेतचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत  व्यक्त केले. तर दुपारी एक वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
              या कार्यक्रमास अनेक मठाधिपती व तालुक्यासह जिल्ह्यातुन,  परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक , नागरिक ,महिला उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद , बजरंग दल, द्वादश पट्टाभिषेक समिती यांच्यासह अनेक भक्तांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सोनटक्के सर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.