सावरगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व यात्रे निमित्त विविध धार्मिक लक्ष्मण शक्ती मुक्तोत्सव सोहळा

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड  : प्रतिनिधी

मुखेड तालुक्यातील सावरगाव (पि.) येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री गोपाळ कृष्णाजी यात्रेनिमित्त श्रीमद् संगीतमय भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा, लक्ष्मण शक्ती मुक्तोत्सव, हरिकिर्तन, गण गवळण व भारुड , बालकलाकारांचे विविध गुणदर्शन, जंगी कुस्त्या अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील भाविकांनी या भव्य धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीकृष्ण यात्रा समिती मंडळ व वारकरी भजनी मंडळ सावरगावच्या वतीने करण्यात आले आहे.

मुखेड तालुक्यातील मौजे सावरगाव ( पि.) येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सोमवार दि. २४ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . अखंड हरिनाम सप्ताह व श्री गोपाळ कृष्णाजी यात्रेनिमित्त भागवत कथाकार ह. भ. प. अरविंद महाराज शास्त्री वृंदावन धाम यांचेकडून श्रीमद् संगीतमय भागवत कथा संपन्न होणार आहे. यावेळी तबला वादक ऋषिकेश पाटील, सिंथवादक व गायक वसंत पाटील आदींची साथ राहणार आहे. तसेच यात्रेनिमित्त मंगळवार दि. ३ मार्च रोजी सकाळी ७:०० वाजता श्रीकृष्णाच्या काठीमाईचे गावात आगमन व भव्य मिरवणूक निघणार आहे. ह. भ. प. नामदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. ५ मार्च रोजी श्री लक्ष्मण शक्ती मुक्तोत्सव सोहळ्याची सांगता होईल. सोमवार दि. २४ फेब्रुवारी ते दि.२ मार्च दरम्यान ह. भ. प. सौ. मैनाताई हिंप्पळनारी, ह. भ. प. भगवान महाराज मुगाव, ह. भ. प. तुकाराम महाराजांचे वंशज ह. भ. प. सोनालीताई मोरे, ह. भ. प. विनोदाचार्य विलास महाराज गेजगे, ह. भ. प. राजेश महाराज गुंजकर , ह. भ. प. नामदेव महाराज दापकेकर यांचे रात्रीचे कीर्तन तर ह. भ. प. साध्वी महंत मुक्ताईनाथ खेर्डा यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे .

तसेच मंगळवार दि. ३ मार्च रोजी रात्री ९:०० वाजता भजनी मंडळ आखरगा विरुद्ध बाबू पठाण हसनीकर व भजनी मंडळ यांचा गण गवळण व भारुडाचा कार्यक्रम रंगणार आहे. बुधवार दि. ४ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता १ ते १३ वयोगटातील बालकलाकारांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तसेच दि. ५ मार्च रोजी जंगी कुस्त्याचा सामना होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांमध्ये मृदंग वादक संजय उमाटे सर, ऋषिकेश पाटील बेळी, शिवराज उमाटे, हरिदास उमाटे, घनश्याम कुलकर्णी, अविनाश कबीर, गायक म्हणून वसंत पाटील बेळी, विठ्ठल पाटील, पांडुरंग पाटील, माधव लद्दे, उत्तम वन्नाळे , माधव महाराज, मारुती महाराज, कोंडीबा महाराज, लक्ष्मण श्रीरामे, जयवंत केसगिर, बालाजी श्रीरामे, शिवराम आखरगा, संजय बादाडे आदी कलाकार उपस्थित राहणार आहेत. तरी परिसरातील भाविकांनी व कुस्तीप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीकृष्ण यात्रा समिती मंडळ व वारकरी भजनी मंडळ सावरगावच्या वतीने करण्यात आले आहे.