मुखेडात आजुळी आलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू पुलाचे काम करण्यासाठी खोदले होते गड्डे

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड :  ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड तालुक्यातील जांब बु पासुन 500 मीटर अंतरावर असलेल्या 10 फुटाच्या खोल खडयात बुडून आजुळी आलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना दि. 22 फेब्राुवारी 2020 रोजी दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान घडली.

शिरुर अनंतपाळ येथील माधव अंतेश्वर सगर व नायगांव (नांदेड) तालुक्यातील ज्ञानेश्वर अशोक पुरगुलवाड या अकरा ते बारा वयोगटातील अल्पवयीन मुलांचा राज्य महार्गावराचे काम चालु असल्याने जांब बु पासुन 500 मीटर असलेल्या पुलाचे बांधकाम चालु असुन त्याठिकाणी मोठा 40 बाय 40 चा खड्डा करण्यात आला होता त्या खडयात शेताकडे जात असताना पाय घसरुन पडल्याने त्यांचा खडयात पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याची माहिती आहे.

 

सदरची घटना कळताच जांब बु येथील पोलिस चौकीचे बिट जमादार नागोराव पोले, सरपंच बाळासाहेब पुंडे, संजय यरपुरवाड तात्काळ घटनास्थळी जाऊन मयतांनी बाहेर काढून शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. पुढील तपास जांब बु चौकीच्या पोलिस उपनिरीक्षक  अनिता ईटुबोने यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.