हैदराबाद येथे घुमला ‘जय शिवराय’चा नारा, हैदराबाद मधील शादनगर येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

इतर बातम्या ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय
हैदराबाद: पवन कँदरकुंठे
                    हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९० वी जयंती संपूर्ण राज्यात करण्यात आली. यामुळे १९ फेब्रुवारी रोजी संपुर्ण राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह दिसला.
तसेच शिवजयंतीचा एक अपुर्व सोहळा दि.१९ फेब्रुवारी २०२० रोजी हैदराबाद येथील शादनगर येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. मुखेड तालुक्यातील वळंकी येथील रहिवासी माधव गोजेगावे यांनी बरेच वर्षे झाले हैदराबाद मधील शादनगर येथे त्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवजयंती चे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा त्यांना संकल्प आला. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर अशी सजावट करून शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार श्रीवर्धन रेड्डी यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले. व भव्य अशी मोटर सायकल रॅली काढण्यात आली. जय जय जय जय शिवाजी जय जय जय जय भवानी, शिवाजी महाराज की जय, असे घोषणाबाजी चे नारे देत मिरवणूक काढण्यात आली व तसेच महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. गरीब व गरजू लोकांना कार्यक्रमात सहभागी करून घेवुन ३५० ते ४०० लोकांना अन्नदान सुद्धा करण्यात आले.
तेलंगणा सारख्या इतक्या मोठ्या राज्यात राहुन मराठमोळ्या युवकांनी शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.अनेक मित्र परिवारांनी मेसेज काँल करून सुद्धा त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित शादनगरचे माजी आमदार श्रीवर्धन रेड्डी, व तसेच एलीकट्टा चे सरपंच साई अण्णा यादव,चेअरमन श्रीशलम कावला,माधव गोजेगावे व इतर नागरिकांची ही उपस्थिती होती.