#बघतोसकायमुजराकर : महाराजांचा जयजयकार करण्यात कमीपणा वाटतो का? मनसेचा मलिकांना खडा सवाल

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण

मुंबई : एमआयएमचे नेते वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा राजकीय वर्तुळातून तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत आहे. हा मलिक यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रायगड किल्ल्यावरील या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार अवधुत तटकरे, विद्या चव्हाण आणि माजी मंत्री फौजिया खानही उपस्थित आहेत. यामध्ये धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत आहे.