बस चालकाशी हुज्जत घालने पडले महागात. प्रवाशांकडून महामंडळाने वसूल केला ते वीस हजार रुपयांचा दंड.

इतर बातम्या नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मुखेड
मुखेड – प्रतिनिधी
       मुखेड आगाराची बस नांदेड येथून मुखेड कडे येणाऱ्या बसचालकाशी एका प्रवाशाने हुज्जत घालून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या घटनेत बस तब्बल चार तास उभी राहिल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले. या प्रकरणी मुखेडचे आगार प्रमुख एस.टी. शिंदे यांनी त्या प्रवाशांकडून तब्बल २३ हजार १२४ रुपयांचा दंड वसूल केला. अशा प्रकारे बसचालकास घालण्याची मोठी किंमत या प्रवाशाला चुकवावी लागली.
       सविस्तर वृत्त असे की मुखेड आगाराची बस क्रमांक एम.एच.४० एन.५६४० बस नांदेड येथून मुखेडकडे निघाली नांदेड येथील देगलूर नाका येथे बस आली असता त्या ठिकाणाहून एक प्रवासी बसमध्ये चढला त्या बसचालकास तू बस  लांब का थांबविला? म्हणून हुज्जत घालून बसचालकाशी अश्लील शिवीगाळ केली. त्या ठिकाणी अर्धा तास वेळ वाया गेला. परत ही बस मुखेड शहरात आल्यानंतर बाराहाळी नाका परिसरात परत या प्रवाशाने बसचालका सोबत भांडणे काढली त्यावेळी चार तास जागेवरच बस थांबवून होती. त्यामुळे आगाराचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. याप्रकरणी मुखेडचे आगारप्रमुख एस.टी. शिंदे यांनी प्रवासी मुस्तकीन नबीवाला रा. नांदेड यांच्याकडून तब्बल २३ हजार १२४ रुपयांचा दंड वसूल केला. यामुळे महामंडळाच्या बस चालका सोबत हुज्जत घालने त्या प्रवाशाला मोठे महाग पडले.