दिव्यांगासाठी होणार साहित्य वाटप

नांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : वैजनाथ स्वामी

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिरकरण मुंबई, भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती जयपूर व एमएलए हॉस्टेल नागपूर यांच्यावतीने 1 ते 7 मार्च या कालावधीत एमएलए हॉस्टेल नागपूर येथे दिव्यांगाना मोफत कृत्रिम अवयव व सहयाभूत साधनांचे वाटप करण्यात येणार आहे.

या शिबीरात दिव्यांगाना तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, कॅलीपर्स, कृत्रिम जयपूर पाय, जयपूर कृत्रिम हात, कुबडया, शुज, बेल्ट, कमी ऐकू येणा-यासाठी श्रवण यंत्र आदी साधानांचे मोफत वाटप होणार आहे. साहित्यासाठी इच्छूकांनी आपली नावे 24 फेब्रुवारी 2020 पर्यंत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय, नांदेड येथे सकाळी 11 वाजेपर्यंत नोंदवावीत, असे आवाहन दिपक अ. धोळकिया, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड व न्या. राजेद्र रोटे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांनी केले.