हमीभावाने तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ

नांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड   : वैजनाथ स्वामी

केंद्र शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम 2019-20 मध्ये हमीभावाने तुर खरेदी करण्याकरिता शेतकरी नोंदणीची मुदत 15 फेब्रुवारी 2020 वरुन 15 मार्च 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करावी व हमीभाव खरेदी केंद्रावर तुर विक्री करुन हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे