बाभळी बंधारा बाधित शेतकरी बांधवांना त्यांच्या शेताचा मोबदला मिळण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना दिले निवेदन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा हदगाव

हदगाव : देवानंद हुंडेकर

अनेक वर्षापासून बाभळी बंधारा ता धर्माबाद जि नांदेड येथील काही गावे बँक वॉटर बाधित शेतकरी नापिकीमुळे त्यांच्यावर जवळपास 100 शेतकऱ्यांची जमीन 170 एकर जमीन बाधित झाली आहे पाटबंधारे विभाग वरिष्ठ अभियंता म्हणतात यंदा जास्त पाऊस झाला त्या कारणाने पाणी थांबले परंतु प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच बाबळी बांध भौगोलिक स्थिती पुढे श्रीराम सागर आहे.

 

जे की तेलंगणा येथे त्याची बँक वाटर क्षमताही बाबळी बंधारा पर्यंत आहे त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना बाभळी बंधारा बँक वाटर मुळे पाण्याखाली येत असल्यामुळे आलेल्या सर्व मधील जमीन पाण्याखाली आलेली आहे त्या जमिनीचा मोबदला अजून मिळाला नाही
जगाचा पोशिंदा असणारा बळीराजाला त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील गवळी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष यांनी थेट मंत्रालयात जाऊन दिले निवेदन